Toll Naka Sakal
मुंबई

Mumbai Toll News : मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर टोल वाढ; जाणून घ्या नवीन दर!

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

Mumbai Toll News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरपासून कारसाठी पाच रुपये तर मिनीबस १० रुपये, ट्रक आणि बससाठी २० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २७ सप्टेंबर २००२ च्या अधिसूचनेत दर तीन वर्षांनी टोल दरवाढीसंदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यानुसार ही टोल दरवाढ केली जाणार आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मुलुंड-ऐरोली, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड, मुलुंड-ठाणे मार्गावरील लाल बहाद्दूर शास्त्री, वाशी येथे सायन-पनवेल महामार्गावरील टोल नाक्यावर टोल दरवाढ लागू होणार. टोल चालकांना वसुलीचे कंत्राट दिले तेव्हाच दर तीन वर्षांनी दरवाढ करण्याची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोल दरवाढ केली जात आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजीही याच पद्धतीने टोल दरवाढ केली जाणार असून, २०२७ पर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे.

यापूर्वीचे टोल दर

मुंबईच्या प्रवेशद्वारांवर २००२ पासून टोलवसुली सुरू असून, सुमारे २५ वर्षे ही वसुली केली जाणार आहे. २००२ मध्ये कारसाठी २० रुपये, मिनीबस २५, ट्रक/बस ४५, अवजड वाहनांसाठी ५५ रुपये टोल होता; तर २०२३ पर्यंत हेच टोलदर कारसाठी ४०, मिनीबस ६५, ट्रक/बस १३०; तर अवजड वाहनांसाठी १६० रुपये टोल वसूल केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT