Light vehicles passing through a toll booth in Mumbai following the waiver announcement. Sakal
मुंबई

Mumbai Toll Waiver: मुंबईकर 'टोल'मुक्त! शहरातील पाचही टोल नाक्यांवर 'या' वाहनांना आता भरावा लागणार नाही शुल्क

Mumbai Toll Mafi: कोणत्याही क्षणी आचारसंहीता लागू होऊ शकते, त्यामुळे आज राज्य मंत्रिमंळाची झालेली बैठक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे.

आशुतोष मसगौंडे

Toll waiver for light vehicles in Mumbai:

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहीता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंळाची झालेली बैठक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारने या बैठकीत मुंबई करांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील हलक्या वाहनांना पूर्णपणे टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आज रात्री बार वाजल्यापासून होणार आहे.

या निर्णयामुळे दहिसर, मुलुंड पश्चिम (एलबीएस रोड), वाशी, ऐरोली आणि मुलुंड पूर्व टोल बूथवरील हलक्या मोटार वाहनांकडून रात्री बारापासून टोलवसुली बंद करण्यात येईल.

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

मुंबईत एमएसआरडीसीने 55 उड्डाणपुलांची उभारणी केली होती. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले होते. पूल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी सन 1999 मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर 2002 मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू केली होती.

महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई मधले टोल माफी करण्यात यावी यासाठी वारंवार मनसेकडून आंदोलने करण्यात येत होती. अनेक वेळा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील या संदर्भात भेट घेतली होती. आता अखेर निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांची टोलच्या जाचातून मुक्तता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT