Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : 'टॉवरच्या आत टॉवर' मुंबईत टाटा पॉवरचे इन्होवेशन, मुंबईत ११० केव्ही पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स उभारले

या सर्व पार्श्वभूमीवर टाटा पॉवर कंपनीने नाविन्यपूर्ण अशी "टॉवरच्या आत टॉवर" संकल्पना राबवत जुने ११० केव्ही पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स बदलून नवीन अरुंद टॉवर्स उभारत एक नाविन्यपूर्ण पर्यायी मार्ग शोधला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai - मुंबईसारख्या महानगरात, जमिनीचा मोबदला आणि संपादनाशी संबंधित उच्च किमतीमुळे विद्यमान ट्रान्समिशन लाइन टॉवर बदलणे कठीण आहे. बहुतेक वेळा नुकसान भरपाई आणि जमिनीशी संबंधित इतर समस्यांमुळे अशा प्रकल्पांना विलंब होत असतो.

या सर्व पार्श्वभूमीवर टाटा पॉवर कंपनीने नाविन्यपूर्ण अशी "टॉवरच्या आत टॉवर" संकल्पना राबवत जुने ११० केव्ही पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स बदलून नवीन अरुंद टॉवर्स उभारत एक नाविन्यपूर्ण पर्यायी मार्ग शोधला आहे. मुंबईत ११० केव्हीच्या लाईनसाठी प्रथमच अशा स्वरूपाचे इनोव्हेशन करण्यात आले आहे.

याबाबत टाटा पॉवरच्या प्रवक्त्यांनी सांगितले कि ," टॉवरच्या आत टॉवर' या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये जुना टॉवर पूर्णपणे काढून टाकावा लागत नाही. जुन्या टॉवरच्या आतल्या छोट्या जागेत हा नवीन टॉवर उभारता येतो. ट्रान्समिशन लाईन्सच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊ शकणाऱ्या या उपक्रमामुळे पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत टॉवर बांधणीचा ३० टक्के वेळेची बचत होते . हे नवीन टॉवर्स बांधण्यासाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी लागणार आहे.

टाटा पॉवर कंपनीचे ११० केव्हीचे एकूण ३,००० ट्रान्समिशन टॉवर्स असून फक्त जुने झालेल्या टॉवर्सच्या आतील भागी नवीन अरुंद टॉवर्स उभारले जाणार आहेत. टाटा पॉवर कंपनीने कल्याणमध्ये असे चार नवीन टॉवर उभारले असून दिवा आणि मुंब्रा भागातील ट्रान्समिशन कॉरिडॉरवर अशा प्रकारचे आणखी टॉवर उभारले जाणार आहेत.

या नावीन्यपूर्ण संकल्पनेमुळे टाटा पॉवरला संपूर्ण मुंबईतील ग्राहकांना आउटेज कालावधी कमी करून विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात मदत झाली आहे तसेच कमी वेळेत दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT