Mumbai Traffic Sakal
मुंबई

Mumbai Traffic : मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबईत पार्किंगसाठी जागा नाही. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे पालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी मॅकेनिकल रोबोट प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत पार्किंगसाठी जागा नाही. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे पालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी मॅकेनिकल रोबोट प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले आहे.

मुंबई - मुंबईत पार्किंगसाठी जागा नाही. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे पालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी मॅकेनिकल रोबोट प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले आहे. बहुस्तरीय यात्रिकी वाहनतळ अंतर्गत शटल व रोवो पार्किंग प्रकारचे वाहनतळ उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मुंबईत पाच जागा बहुस्तरीय वाहनतळासाठी पालिकेने निश्चित केल्या आहेत. त्यामुळे मुबईतील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोडी आणि पार्किंगची समस्या भविष्यात अधिक गुतुगुतीची होणार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नजिकच्या काळात बहुस्तरीय पार्किंग सुविधा तसेच मॅकेनिकल रोबोट प्रणालीचा वापर यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. पार्किंग सुविधेसाठी मुंबईत बहुस्तरीय यात्रिकी वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यात माटुंगा येथे 575 आणि मुवादेवी येथे 546 गाड्याच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध होणार आहेत. शटल आणि रोबो पार्किंग प्रकारचे वाहनतळ उभारण्यासाठी कनाटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, या दोन ठिकाणच्या कामासाठी कार्यादेश देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

बहूस्तरीय पार्किंग सुविधेसाठी वांद्रे पश्चिम येथील पटवर्धन पार्क, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय तसेच इंजिनिअरिंग हब वरळी या तीन जागाही पालिकेने निश्चित केल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या कामासाठीही लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहेत.

उद्यानाच्या जमीनीचाही होणार वापर

पालिकेच्या उद्याने आणि क्रीडांगणांच्या जमीनीखालील जागेचा तसेच जमीनीवरील मोकळ्या जागेचाही बहुस्तरीय वाहनस्थळासाठी वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

उत्पन्न दर्जेदार सुविधासाठी वापरणार

वाहनतळातून मिळणारे उत्पन्न पालिकेच्या इतर कामासोबतच वाहनतळाच्या पायाभूत सुविधा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी तसेच पादचा-यांना सुविधा देण्यासाठी वापरण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT