Video Viral Sakal
मुंबई

Mumbai Crime : मीटरने जाण्यास रिक्षाचालकाने दिला नकार! तक्रारीनंतर मुंबई पोलिसांची त्वरित अॅक्शन | Video Viral

रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबई येथील रिक्षाचालक किंवा ट्रक्सीचालक प्रवाशांना लुबाडण्याच्या अनेक घटना घडत असतात. तर थोड्या अंतरावर जाण्यासाठी जास्त पैसे घेण्याचे प्रकार घडत असतात. पण रिक्षाचालक मीटरप्रमाणे पैसे घेत नसेल तर त्याची तक्रार आपण वाहतूक विभागात करू शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ, मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्टेशन पूर्व बाहेरील असल्याची माहिती आहे. तर एक प्रवासी रिक्षाचालकाला सदर ठिकाणाहून अंदाजे दीड किलोमीटर जाण्यासाठी विचारतो तेव्हा तो त्याला ५० रूपयांची मागणी करतो. यानंतर सदर प्रवाशाने या रिक्षाचालका विरोधात तक्रार नोंदवली आहे. तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना दोन वेळेस फोन करावा लागला पण त्यानंतर पोलिसांच्या वाहतूक विभागाने यावर तत्काळ कारवाई केली आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर वाहतूक विभागाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत आपली तक्रार वाकोला वाहतूक विभागाला कळवली असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर ट्वीटरवरील @sagarawate या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT