मुंबई

मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये; जप्त केल्या हजारो गाड्या, कारवाईचा आकडा बघून व्हाल चकित

पूजा विचारे

मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस तळं ठोकून आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात झालेला दिसतो. मुंबईत कोरोनाचा उद्रेकही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान राज्य सरकार हळूहळू मुंबई अनलॉक करत आहे. बऱ्याच प्रमाणात लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. अशातच अनलॉक केल्यानंतर गर्दी होऊ नये यासाठी सरकार अनेक उपाय करताना दिसत आहे. मात्र तरीही गर्दी कमी होत नसल्यानं मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच परवाना नसतानाही वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध आणि कारणास्तव वाहन बाहेर काढणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या ४ दिवसात तब्बल दोन हजारांहून अधिक गाड्या जप्त केल्यात.

नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून ही वाहने जप्त केली असल्याच पोलिसांनी सांगितलंआहे.  फक्त नियम मोडले ही कारवाई होणार नसून ती कारवाई तुमच्या सुरक्षेसाठीही आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. 

मुंबई पोलिसांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवरून एक माहिती दिली होती. जर विनाकारण किंवा विनापरवाना तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असं ट्विट पोलिसांनी केलं होतं. 

सध्या मुंबई शहर कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं हे सर्वाची जबाबदारी असून गरजेचं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यामुळे नियम भंग केल्यास पोलिस कारवाई करतील आणि त्यासोबतच वाहनही जप्त करतील असा इशाराच मुंबई पोलिसांनी दिला. त्यामुळे मुंबईत गाडी चालवत असाल तर दहा वेळा विचार करा नाहीतर तुम्हालाही पोलिसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.

Mumbai Traffic Police seized more than 2000 vehicles in the last 4 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT