mumbai traffic police sakal
मुंबई

Mumbai Traffic Police : वसईत पोलिसाला बोनेटवरून दीड किलोमीटर फरपटत नेले

तरुण अटकेत; १६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : सिग्नल तोडून भरधाव वेगात पळणाऱ्या कारचालकाला अडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेट वरच दीड किलोमीटर फरपटत नेत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसईच्या एव्हरशाईन परिसरात रविवारी (ता. १२) रात्री घटना घडली. या घटनेत वाहतूक पोलिस बचावला असून, किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत आरोपीविरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आज (ता. १३) त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली. सोमनाथ चौधरी हा वाहतूक पोलिस हवालदार वसंत नगरी सिग्नलवर रविवारी रात्री कर्तव्य बजावत होता.

रात्री पावणेआठच्या सुमारास कारचालक (यूपी ३२ डीजे ७७०७) सावेश सिद्दीकी (२१) हा वाहन चालवण्याचे परवाना नसताना सिग्नल तोडून, भरधाव वेगात कार चालवत होता. यावेळी हवालदार चौधरी याने हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. वाहतूक पोलिस कारसमोर आले असता त्यांना कारच्या बोनेटवर घेऊन वसंत नगरी सर्कल ते रेंज नाक्यापर्यंत फरफटत नेले.

या वेळी काही जागरूक वाहनधारकांनी कारच्या समोर वाहन लावून कार थांबवून कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT