Mumbai Train  
मुंबई

Mumbai Train : कोकणासाठी आणखी ५२ गणपती स्पेशल ट्रेन! गाड्यांची संख्या २०८ वर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य रेल्वेने आखणी ५२ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ५२ गणपती विशेष गाड्यामध्ये दिवा-चिपळूण दरम्यान ३६ मेमू स्पेशल आणि मुंबई-मंगळुरू दरम्यान १६ स्पेशल गाड्यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी १५६ गणपती विशेष रेल्वे गाड्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची २०८ वर पोहचली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळनार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिवा-चिपळूण मेमू विशेष ३६ सेवा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११५५ मेमू दिवा येथून १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी १.२५ वाजता चिपळूणला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११५६ मेमू चिपळूण येथून १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाड्यांना पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबा देण्यात आला आहे.

मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष गाडीच्या १६ सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११६५ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ ते १८ सप्टेंबर, २२ ते २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन सायंकाळी ५.२० वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

तसेच ट्रेन क्रमांक ०११६६ स्पेशल मंगळुरु जंक्शन १६ ते १९ सप्टेंबर, २३-२४ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला दुपारी १.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

सोमवारपासून आरक्षण सुरु

५२ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण ३ जुलै रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT