tukaram-munde sakal
मुंबई

Mumbai : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आरोग्य विभागातील कारभार घेतला काढून

मुंडेंना पुन्हा नियुक्तीसाठी प्रतिक्षा

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दंबग स्टाईलने काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना राज्य सरकारने पुन्हा हिसका दाखविला आहे. त्यांच्याकडील आरोग्य विभागाचा कार्यभार काढून त्यांना पुन्हा नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यांचा वनवास अद्याप संपता संपत नसल्याचेही बोलले जात आहे. गेल्या वर्षात नागपुरच्या पालिका आयुक्तपदावरून अवघ्या काळातच त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी बदली केली होती. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदी बदली केल्यानंतर आॅक्टोंबर महिन्यात आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रिय आरोग्य अभियान संचालक पदाचा कारभार मुंडे यांनी हाती घेतला होता. मात्र आता दोन महिन्यातच राज्य सरकारने मुंडे यांचा कार्यभार काढून घेत रामराम ठोकला आहे.

मंगळवारी मुंडे यांच्यासह इतरही सनदी अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने बदल्या केला आहे. मात्र, त्यापैकी मुंडे यांच्या नियमीत आणि प्रभारी पदांचा कारभार काढून त्यांना पुढील नियुक्तीच्या आदेशासाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. मुंडे यांनी आॅक्टोंबर महिन्यात आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रिय आरोग्य अभियान संचालक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला होता. वेळेवर हजेरी लावण्यापासून आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची जबाबदारी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली होती.

मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार मुंडे यांनी आरोग्य विभागात गेल्या काहीच दिवसात शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याने अखेर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दबावातून राज्य सरकारने मुंडे यांची पुन्हा विकेट घेत त्यांना विना कार्यभार ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

मुंढेच्या बदलीचा विक्रमच

सरकार कोमतेही असले तरी तुकाराम मुंढेच्या कार्यशैलीत बदल होत नाही. त्यामूळे झटक्यात निर्णय घेतल्याने अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहे. त्यामूळे मुंढे यांना वेळोवेळी बदलीला सामोरे जावे लागले आहे. मुंढे 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहे. गेल्या 16 वर्षांच्या सेवेत मुंढेंची 20 पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांची प्रशासनात ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT