kdinapping .jpg
kdinapping .jpg 
मुंबई

मुंबई: अवघ्या दोन मिनिटांच्या किडनॅपिंगसाठी सहा महिने तुरुंगवास

दीनानाथ परब

मुंबई: अवघ्या दोन ते तीन मिनिटांसाठी झालेल्या अपहरणाच्या एका गुन्ह्यात आरोपीला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपहरण केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटात मुलीच्या वडिलांनी आरोपीला पकडले. ते घराजवळ बाईक पार्क करत असताना, मुलगी गेट जवळ थांबली होती. सलग २० दिवसाच्या सुनावणीनंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ही घटना घडली होती. 

मुलगी एकटीच उभी होती. तिला कुठली भीती वाटू नये, या भावनेतून मी तिला उचलून घेतले असा आरोपीने दावा केला. न्यायालयाने मुलीची साक्ष ग्राहय धरुन आरोपीचा दावा फेटाळून लावला. आरोपी मुलीला उचलून घेऊन निघाला, तेव्हा त्याने तिला काहीही विचारले नव्हते. कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली असली, तरी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यास नकार दिला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

मुलीचे अपहरण करण्याच्या उद्देशाने आरोपी घटनास्थळी आला नव्हता, हे आरोपीचे म्हणणे कोर्टाने मान्य केले. पण मुलीला एकटे पाहून त्याने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. "कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तो कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने एक हजार रुपये दंड व सहा महिन्याची शिक्षा पुरेशी आहे" असे कोर्टाने म्हटले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT