mumbai univercity sakal
मुंबई

मुंबई विद्यापीठाला मिळाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा

नॅककडून अधिकृतरित्या ही घोषणा करण्यात आली

संजीव भागवत

मुंबई : मुंबईची शान असलेल्या मुंबई विद्यापीठाला (Mumbai univercity) नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठीची घोषणा नॅककडून आज अधिकृतरित्या करण्यात आली. यासाठी विद्यापीठाला एकूण 3.65 गुण मिळाले आहेत. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांच्या एकूण तुलनेत सर्वाधिक असे गुण मिळवले आहेत.

मुंबई विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील व्यवस्थापन सदस्य, सिनेट सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यासोबतच सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या या दर्जाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. हा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठातील अनेक महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम, संशोधनाचे कामकाज त्यासोबतच विविध प्रकारच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जामध्ये ही मोठी सुधारणा होण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे.मागील पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळाला नव्हता. यामुळे विद्यापीठातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना खीळ बसली होती. तर दुसरीकडे विद्यापीठात असलेल्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही याचा मोठा फटका बसला होता.

मात्र, आता हा दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, विविध प्रकारचे अनुदानाचे प्रकल्प यासोबतच विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या करारावर सोबतच शैक्षणिक देवाण-घेवाण असे अनेक मार्ग यापुढे खुले होणार असून हा दर्जा मिळाल्याने मुंबई विद्यापीठ हे पुन्हा एकदा देशातील नामांकित विद्यापीठाच्या श्रेणीत जाऊन बसेल असा विश्वास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT