degree Admission sakal media
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशात कला शाखेचीच मोठी चुरस

मागील वर्षांच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कटऑफ वधारला

संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) पदवी प्रवेशाची (degree admission) पहिली गुणवत्ता यादी (admission list) आज जाहीर झाली यात पहिल्यांदाच कला शाखेच्या (arts) प्रवेशासाठी मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. कला शाखेचा कट ऑफ (cut off) तब्बल सात ते आठ टक्क्यांनी तर त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा (commerce) कट ऑफ चार ते पाच टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सुमारे 836 हून अधिक महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएससी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेची कटऑफ ही 95 टक्केच्या दरम्यान जाऊन पोहोचली असून त्यानंतर वाणिज्य अणि विज्ञान शाखेची कटऑफ पोहोचली आहे. त्यातही यंदा अनेक वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पात्रता गुणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यात विशेषत: मूलभूत विज्ञान विषयांपेक्षा कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचेही समोर आले आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, त्यांना १८ ते २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत. त्यानंतर दुसरी यादी २५ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येईल. मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रवेशाला मोठी मागणी असते. त्यात यंदा या शाखेच्या कट ऑफ गुणांमध्येही यंदा पाच टक्क्यांपर्यंत फरक पडला आहे. वाणिज्य शाखेतील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये नव्याने सुरू झालेले विषय, व्यावसायिक विषयांचे अभ्यासक्रम, स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे.

काही महाविद्यालयातील तुलनात्मक कटऑफ (टक्क्यांमध्ये)

कॉलेज २०२१ २०२० २०१९

झेविअर्स कॉलेज

बीए(एचएससी) ९८ ९२ ९२.३१

बीए (इतर बोर्ड) ९९,१७ ९८.६० ९८.४२

बीएससी (आयटी). ९४ ९४ ९२

म. ल. डहाणूकर महाविद्यालय

बीकॉम ८६.८३ ८४.४६ ८४.४६

बीएफएम ८५ ७७.२३ ७२

बीएएफ. ८९ ८४.१५ ८२.६२

रुपारेल कॉलेज.

बीए - ९३.१६ ८८.६१ -

बीकॉम - ८५.३३ ८३.२३ -

बीएस्सी : ९०.०० ७९.०० -

कॉम्प्युटर सायन्स ८५.८३ ७४.७६ -

साठ्ये कॉलेज

बीए ७४.६६ ५३.८४ -

बीकॉम ८७.३३ ७४.७६ -

बीएस्सी ८४.८३ ६३.२३

यावर्षीचे काही महाविद्यालयांचे कट ऑफ (टक्क्यांमध्ये)

सेंट झेवियर्स महाविद्यालय

शाखा मेरिट (टक्केवारी)

कला 95.80 टक्के(अल्पसंख्यांक)

कला 99.17 टक्के (खुला प्रवर्ग )

विज्ञान 61.00 टक्के (अल्पसंख्यांक)

विज्ञान 92.00 टक्के (खुला प्रवर्ग )

केबीपी हिंदुजा महाविद्यालय

बीएमएस(वाणिज्य) 93.80‍ टक्के

बीएमएस(विज्ञान) 85.50 टक्के

बीएमएस(कला) 83.67 टक्के

बीकॉम 90.33 टक्के

बीएसस्सी आयटी 85.00 टक्के

विल्सन महाविद्यालय

बीए - ९४

बीएसस्सी - ८३.२

बीकॉम ९०.३३

बिर्ला महाविद्यालय

बीए - ८०

बीकॉम - ८६

बीएसस्सी -

पीसीएम - ६६.१५

सीबीझेड - ६५

मायक्रोबायोलॉजी - ८५

जय हिंद महाविद्यालय

बीए - ९६.२०

बीकॉम - ९३

बीएससी - ७५

बेडेकर महाविद्यालय

बीए - ८७

बीकॉम - ८८.१६

रुईया महाविद्यालय

बायोअनॅलिटीकल सायन्स - ९७.३३

बायोकेमिस्ट्री - ९८.८

बायोटेक्नॉलॉजी - ९९

कम्पुयटर सायन्स - ९८.१७

अनुदानित - ९८.८३

बीए - ९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT