heavy rainfall 
मुंबई

मुंबई विद्यापीठाला मुसळधार पावसाचा फटका, 'या' परीक्षा पुढे ढकलल्या

संजीव भागवत

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या कोकण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) मुंबई विद्यापीठाच्या(Mumbai university) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३० जुलै, २०२१ पासून सुरु होत असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (Degree syllabus) सत्र - १ व सत्र - २ च्या १६ परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा १८ ऑगस्ट, २०२१ पासून घेण्यात येणार असून त्याचे स्वतंत्र असे वेळापत्रक (Timetable) जाहीर केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. ( Mumbai University Exam postponed due to heavy rainfall -nss91)

आयडॉलच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सत्र - २ च्या प्रथम वर्ष बी.ए., प्रथम वर्ष बी.कॉम, प्रथम वर्ष बी.एससी. आयटी व पदव्यूत्तर एमएससी गणित व आयटी आणि प्रथम वर्ष एमसीए तसेच बीएससी आयटी (सत्र - ४ व ६), एमसीए (सत्र - ४ व ६), पिजीडीएफम व पीजीडीओरएम (सत्र - २), या परीक्षेबरोबरच शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर - २०२१ मधील सत्र - १ च्या प्रथम वर्ष बी.ए., प्रथम वर्ष बी.कॉम व प्रथम वर्ष एमए आणि एम कॉमच्या अशा १६ परीक्षा ३० जुलै, २०२१ पासून ऑनलाईन माध्यमातून सुरु होणार होत्या. परंतु मुंबई व कोकण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा १८ ऑगस्ट, २०२१ पासून घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT