Mumbai University Graduate Senate Election esakal
मुंबई

Mumbai University : अखेर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांच्या तारखा जाहीर; 'असे' असेल वेळापत्रक

रोहित कणसे

मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यापिठाने यासंबंधीची अधिसूचना जाहीर केली आहे. २१ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून आणि २४ एप्रिल २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे.

या निवडणूकांसाठी नव्याने मतदार नोंदणी सुरू होत आहे. यादरम्यान याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेल्यांना पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाहीये. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करता येणार आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीपासून मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रखडली आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले होते. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नितीन एम. जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने सुधारित कार्यक्रम तयार करण्यासाठी आणखी मुदत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT