Mumbai University  Sakal
मुंबई

Mumbai University:मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले; मुंबई विद्यापीठाने जाहीर केली अधिसूचना

10 सप्टेंबर रोजी मतदान ,तर 13 सप्टेंबर रोजी मतमोजणी.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai University Election:मागील वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्याची अधिसूचना आज मुंबई विद्यापीठाने जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी 10 सप्टेंबर रोजी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट सदस्याच्या दहा जागासाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पाच खुल्या प्रवर्गातील आणि पाच राखीव जागांचा समावेश आहे. राखीव जागांमध्ये एक अनुसूचित जाती आणि एक विमुक्त जाती व भटक्या जमाती तर तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत.

पदवीधर सिनेट सदस्याच्या या दहा जागांच्या उमेदवारीसाठी 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. तर अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होईल. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या वैधतेसह इतर काही तक्रारी असल्यास त्या संदर्भातील अपील 23 ऑगस्ट रोजी कुलगुरूंकडे करता येईल.

तर 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळामध्ये मतदान होणार असून मतमोजणी ही 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल, अशी माहिती आज विद्यापीठाकडून देण्यात आले.

मागील पदवीधर सिनेटच्या सर्व दहा जागांवर युवासेनेचे वर्चस्व राहिले होते. यावेळी युवा सेनेने जोरदार तयारी केली असली, तरी यावेळी त्यांच्या विरोधात मैदानात मनविसे, अभाविप, छात्र भारती आदी विद्यार्थी संघटना उतरणार आहेत. त्यांनीही मतदार नोंदणीसाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे युवा सेनेला ही पदवीधर सिनेट निवडणूक मोठ्या आव्हानांची असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT