मुंबई

प्रचंड गोंधळानंतर मुंबई युनिव्हर्सिटी आयडॉलच्या परीक्षा अखेर पुढे ढकलल्या

तेजस वाघमारे

मुंबई ता. 7 : मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) तांत्रिक अडचणींमुळे न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 19 ॲाक्टोबरपासून सूरू होणार असून परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस 3 ऑक्टोबर पासून  सुरुवात झाली. परंतु ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याचा प्रकार समोर येताच विद्यापीठाने मंगळवार (ता.6) व बुधवार (ता.7) ऑक्टोबरला होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलले होते.

यानंतर होणाऱ्या परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी विद्यापीठाने बुधवारी बोलावलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेतांना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी  करू नये असेही संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.

परिक्षेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक, लॉगिन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचे प्रकार घडत  असल्याने विद्यार्थ्यांनी आयडॉल इमारतीबाहेर गोंधळ घातला होता. विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठावर तीव्र टीका केली होती.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai university idol exams finally postponed after chaos and hacking

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT