mumbai university sakal
मुंबई

ऑनलाइन पेपरला कॉपी; मुंबई विद्यापीठ करतंय ऑफलाइन परीक्षेची तयारी

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाइन परीक्षेमध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून त्यामुळे विद्यापीठाने याची दखल घेतली आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा पुढच्या सेमिस्टरमध्ये ऑफलाइन कऱण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षांमध्ये वाढत्या कॉपीच्या प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता टप्प्याटप्प्याने ऑनलाइनन परीक्षांचा पर्याय थांबवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रम, इंजिनिअरिंग, लॉ, एमबीए यांच्या परीक्षा पुर्णपणे ऑफलाइन करण्यासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती मिळत आहे.

ऑनलाइन परीक्षेमध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून त्यामुळे विद्यापीठाने याची दखल घेतली आहे. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. ऑनलाइन परीक्षा थांबवून टप्प्याटप्प्याने ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. पुढच्या सेमिस्टरला काही अभ्यासक्रमाचे पेपर ऑफलाइन होतील. तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत विद्यार्थ्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्यानं विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

कॉपी कशी व्हायची?

पेपर सुरु होताच काही मिनिटातंच त्याची उत्तरे व्हायरल व्हायची. विद्यार्थ्यांना ग्रुपवर प्रश्नपत्रिकेतील उत्तरे यायची. अशा प्रकारच्या कॉपी करण्याच्या प्रकाराला आळा घालणं ऑनलाइन पद्धतीमध्ये शक्य नसल्यानं विद्यापीठ आता ऑफलाइन परीक्षा घेण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT