Mumbai University Senate Election esakal
मुंबई

Senate Elections: विधानसभेची सेमीफायनल, मुंबई कुणाची? प्रतिष्ठेची निवडणूक जाहीर! ठाकरे गट-भाजपसाठी अस्तित्वाची लढाई

Mumbai University Senate Election: सिनेट निवडणुकीला विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हटले जाते. सर्व राजकीय पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई असते. गेल्यावेळी ठाकरे गटाच्या सदस्य नोंदणीत मोठा वाटा होता. भाजपला तयारी करायला वेळ न मिळाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आल्याची चर्चा होती.

Sandip Kapde

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आता 22 सप्टेंबरला होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया 25 सप्टेंबरला होईल. मागील दोन वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक आता सप्टेंबर महिन्यात निश्चित करण्यात आली आहे. या दरम्यान विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यास किंवा आचारसंहिता लागू झाल्यास पुन्हा एकदा या सिनेट निवडणुकीवर टांगती तलवार पाहायला मिळू शकते.


सिनेट निवडणुकीसाठी एकूण दहा जागा

मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, उर्वरित पाच जागा एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्षांचा सहभाग

सिनेट निवडणुकीला विद्यापीठाच्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हटले जाते. सर्व राजकीय पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई असते. गेल्यावेळी ठाकरे गटाच्या सदस्य नोंदणीत मोठा वाटा होता. भाजपला तयारी करायला वेळ न मिळाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.

भाजप नेते ॲड. आशीष शेलार यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्टला सिनेट निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात असताना विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत मतदारांच्या छाननीसाठी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीचा अहवाल स्वीकारत ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान निवडणुकीसाठी मतदारांची नव्याने नोंदणी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.

तर शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सिनेट निवडणुकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीश किंवा आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी केली होती.

सविस्तर वेळापत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. 22 सप्टेंबरला सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 25 सप्टेंबरला मतमोजणीला सुरुवात होऊन त्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT