aditya Thackeray 
मुंबई

Senate Result: 'अगोदर पोराशी निपटा, मग बापाचा विषय...; निवडणुकीतील 100 टक्के स्ट्राईक रेटनंतर आज मातोश्रीवर जल्लोष

Mumbai University Senate Election result 2024: युवासेनेने १० पैकी १० जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर शिवसेवा उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव केला आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- वेगवेगळ्या कारणांसाठी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या निवडणुका अखेर पार पडल्या. याचा निकाल जाहीर झाला असून युवासेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला व्हाईटवॉश दिला आहे. युवासेनेने १० पैकी १० जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर शिवसेवा उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव केला आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुन्हा एकदा १० पैकी १० जागा. ज्यांनी आम्हाला मतदान केलं आणि सर्व शिवसेना आणि युवा सेनेचे माझे सहकारी, सर्वांना खूप धन्यवाद. तुम्ही दाखवलेला विश्वास, पाठिंबा, घेतलेली मेहनत आणि आशीर्वाद याबद्दल आभारी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दालीच्या फौजदारांनो, वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यानो.. अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! आता करत बसा.. 'नरेटिव्ह.. नरेटिव्ह..' , असं म्हणत त्यांनी वार केला.

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरी पुन्हा करून दाखवलेली नसून ती अधिक सुधारली आहे. आमचा १०० टक्के स्ट्राईट रेट आहे. येथून आमचा निवडणूक विजयाचा शुभारंभ झाला आहे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहे. सिनेटमधील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

रात्री उशिरा दहाही जागांवरील निकाल जाहीर झाले. युवासेनेने उत्तम कामगिरी करत सर्व जागा जिंकल्या. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपची संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या उमेदवारांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा सत्ताधारी पक्षासाठी मोठा धक्का आहे, तर मविआसाठी दिलासादायक गोष्ट आहे.

मुंबई विद्यापीठाने निवडणुकीला दोन दिवस असताना त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होतं. यावेळी कोर्टाने निवडणुका घ्याव्याच लागतील असे आदेश दिले होते. त्यासाठी प्रशासनाला दोन दिवस वाढवून देण्यात आले होते. युवासेनेचा विजय होईल अशा भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती, असा आरोप मविआच्या नेत्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT