Mumbai University Esakal
मुंबई

Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

Sandip Kapde

Mumbai University Election: मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे.

रातोरात परिपत्रक काढून या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाने हे परिपत्रक काढले आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

अचानक निवडणुका रद्द केल्याने मनसे आणि ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक येत्या १० सप्टेंबरला होणार होती. या निडणुकीसाठी ठाकरे आणि मसनेने चांगली तयारी केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, "सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे"


ठाकरे गटाचे  वरुण सरदेसाई म्हणाले,  "मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे". (mumbai latest news)

विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक रद्द केल्याचे सांगितलं. विद्यापीठाने कोणतेही ठोस कारण आले नाही. पण सरकारने विद्यापीठाला पत्राद्वारे निवडणूक रद्द करण्याचे सांगितले, अशी माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil Fact Check : 'भाकरी करपली नाहीच' आयपीएस विश्वास नांगरे पाटलांनी कविता लिहली की नाही?, महाराष्ट्र सरकारकडून फॅक्ट चेक

INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

SCROLL FOR NEXT