Unlock  esakal
मुंबई

मुंबई आता १० वाजेपर्यंत सुरू; कुठे मिळाली सूट, पाहा नियमावली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत; तर उपाहारगृहे, हॉटेल संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आज महापालिकेने दिली आहे. मंगळवारपासून (ता. ३) ही नियमावली लागू होणार आहे. कोविड निर्बंधांबाबत सोमवारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली. त्या आधारे महापालिकेनेही दिलासा देत दुकाने, आस्थापने आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

आतापर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी होती. शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी होती. आता हॉटेल, उपाहारगृहेदेखील आठवड्याचे सातही दिवस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जलतरण तसेच इतर निकटचे संपर्क असलेले खेळ वगळता इतर क्रीडा प्रकारांनाही सातही दिवस परवानगी देण्यात आली आहे. तसेच चित्रीकरणही निर्धारित वेळेत करण्याची परवानगी आहे. मुंबईतील गेल्या दोन आठवड्यातील कोविडवाढीचा सरासरी दर १.७२ टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. त्यामुळे महापालिकेने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत.

मुंबई लोकलचं काय?

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील असं सांगण्यात आलं आहे. मुंबई लोकलचं जाळं हे मुंबई, उपनगर, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे लोकल ट्रेनबद्दल नक्की काय निर्णय घेतला जाणार किंवा सर्वसामान्य नागरिकांना परवानगी मिळणार का याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. लोकलमधून प्रवास करायला देण्याची मोठी मागणी आहे, पण आजच्या नियमावलीत याचा उल्लेख नाही. त्यामुळे हा निर्णयदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागच घेईल असं स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT