Anil Parab sakal
मुंबई

Mumbai : वज्रमूठ सभेची गर्दी बघून विरोधकांनी तोंडात बोट घालण्याचे काम करावे; अनिल परब

सभेत प्रत्येक पक्षातील दोन नेते भाषण करणार आहे. ते कोण करतील याचा निर्णय त्या त्या पक्षाचा आहे. त्यामुळे सभेची गर्दी बघून विरोधकांनी फक्त तोंडात बोट घालण्याचे काम करावे, अशा शब्दात परब यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र दिनी १ मे रोजी महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भाषण करू दिल्या जाणार नाही. अशी विरोधकांकडून टीका केली जात असताना, शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. आमच्या सभेत कोण भाषण करणार याचा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षाचे पक्षप्रमुख घेतील, विरोधकांना त्याची काळजी करायची गरज नाही.

सभेत प्रत्येक पक्षातील दोन नेते भाषण करणार आहे. ते कोण करतील याचा निर्णय त्या त्या पक्षाचा आहे. त्यामुळे सभेची गर्दी बघून विरोधकांनी फक्त तोंडात बोट घालण्याचे काम करावे, अशा शब्दात परब यांनी विरोधकांवर टीका केली आहे. वज्रमूठ सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ते बीकेसी मैदानावर आले होते.

महाराष्ट्र दिनी बीकेसीत होणाऱ्या वज्रमूठ सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मुंबई आणि उपनगरातून लाखोंचा जनसमुदाय सभेसाठी येतील असा अंदाज असल्याने त्याप्रमाणेच भव्य अशी तयारी केली जात आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांची संख्या मंचावर बसेल असा भव्य मंच तयार केला जात असून, दिवसाचे तापमान लक्षात घेता सभेचा वेळ संध्याकाळी घेण्यात आला आहे. सध्या खुर्च्या टाकण्याचे काम सुरू असून तिनही पक्षाच्या नेत्यांकडून सभेची पाहणी केली जात असून, शनिवारी शिवसेना नेते अनिल परब यांनी सभेच्या तयारीची पाहणी केली.

मुंबईतल्या अनेक मैदानावर यापूर्वी पक्षाच्या सभा पार पडल्या आहे. मुंबईत पक्षाची ताकत काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. ही तर महाविकास आघाडीची सभा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणाहून ही जास्त गर्दी इथे होईल असं वाटतं. सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी सभेच्या ठिकाणी १०० डॉक्टर, २५ रुग्णवाहिका, पार्किंगची सोय, महिला पुरुषांना टॉयलेटची सोय केली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT