Accident Sakal
मुंबई

Mumbai Accident: दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांचा अपघात; 5 ठार 3 गंभीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरती अपघात झाला असून यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाला असून एकावर एक गाड्या आदळल्या. त्यामुळे वरळीकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तर अपघातातील ३ जण गंभीर जखमी असून मृत्यूची भिती व्यक्त केली जात आहे.

(Mumbai Vandre Varali C-Link Accident)

अपघात झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेलाही दोन गाड्यांनी धडक दिली आहे. त्यामुळे या अपघातात एकून ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दसरा मेळाव्यासाठी आलेल्या गाड्यांना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वरळी सी लिंकवर थांबण्यास मनाई असतानाही काही गाड्या या ५ ऑक्टोबर रोजी सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनाने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वायरल होत आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आले असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहे. तर बंदी असताना वाहने घातल्याने हा अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT