Mumbai 
मुंबई

Mumbai : विठ्ठला....! झोपलेल्या सरकारला जागे कर; टाळ-मृदंग वाजवून शेतकऱ्यांचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळावी.  तसेच  डिभे धरणातील जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यांच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात पळवू पाहणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  सोमवारपासून आझाद मैदानावर एल्गार

आंदोलन सुरू केले. गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्ताने आझाद मैदानांवर ‘वारकरी टाळ-मृदंग वादन करून विठ्ठलाकडे आपल्या मागणीसाठी सरकराला जाग येऊ दे असे साकडे घातले आहे. 

आंबेगाव तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठार या भागातील शेतीला मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. 

शेतकऱ्यांचे सातबारा उताऱ्यावरील पुनर्वसन खात्याचे शिक्के त्वरित काढावेत व डिंभे धरणातून ( बाबू गेनू जलाशय) काढण्यात येणाऱ्या बोगदयाला विरोध असून सदर बोगदा नामंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. बेमुदत आमरण उपोषणचा चौथा दिवस आहे.

कळमोडीचे पाणी सातगाव पठार भागाला देण्यास टाळाटाळ केल्यास व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे नगर जिल्ह्यात पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव तालुका, खेड तालुका, तसेच शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे, असे देविदास दरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT