बांद्रा स्टेशन sakal
मुंबई

Mumbai : बांद्रा नव्हे वांद्रे हवे ! मराठी भाषा प्रेमींची केंद्राकडे तक्रार

भारतीय रेल्वेवर त्रिभाषेनुसार कामकाज चालवण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना असताना पश्चिम रेल्वेकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय रेल्वेवर त्रिभाषेनुसार कामकाज चालवण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना असताना पश्चिम रेल्वेकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. नुकतेच ऐतिहासिक स्थानक संवर्धन पूर्ण झालेल्या वांद्रे स्थानकाचे नाव बांद्रा स्टेशन असे झळकवण्यात आले आहे. यामुळे मराठी भाषा प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून याबाबत थेट केंद्रीय प्रशासनिक सुधार आणि जन तक्रार विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वेने ऐतिहासिक वांद्रे स्थानकाच्या संवर्धनाचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. यामुळे स्थानकाला नवी झळाळी प्राप्त झालेली आहे. सायंकाळी दिव्यांच्या उजेडात स्थानक इमारत आणखी लख्ख चकाकते. स्थानक संवर्धनासाठी तब्बल ११ कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. मात्र या खर्चानंतर देखील स्थानकाचे नाव मराठीत झळकलेले नाही. त्यामुळे मराठी भाषा प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून याबाबत थेट केंद्रीय प्रशासनिक सुधार आणि जन तक्रार विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.

तक्रारदार हेमंत आठले यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा राजभाषा ही मराठी आहे. इंडिया सरकारच्या त्रिभाषा सुनीनुसार राज्याची राजभाषेचा प्रथम वापर करणे हे सर्व शासकीय संस्थांना बंधनकारक आहे. असे असूनही चां लोहमार्ग स्थानकाच्या [द्रि लोहमार्ग स्थानक, मुंबई। नामफलकार मराठीचा वापर नाही.

इतकेच नाही तर इंग्रजी भाषेत स्थानकाचे नाव Vandre ऐवजी Bandra असे करण्यात आले आहे. सदर प्रकार हा नियमबाह्य आहे. तरी सदर अधिकान्यांवर मराठी द्वेष केल्याप्रकरणी बडतर्फ करावे तसेच नियमानुसार नामफलक राष्ट्रभाषा मराठीत करण्यात यावा परकीय भाषेतील फलकावर वांद्रे / Vandre असा उल्लेख असा देशद्रोही अधिकाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असेही हेमंत आठले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT