Railway News sakal
मुंबई

Railway News: प्रशासनाची कळकळीची विनंती, लोकलचं काम महत्वाचं आहे कृपया...

सकाळ डिजिटल टीम

Railway News: उपनगरीय लोकल ट्रेनच्या पिक अवर्समधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबईतील खासगी आणि शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याची विनंती संबंधित कार्यालयांना पत्र पाठवून करणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याची संधी अलीकडेच उपलब्ध करून दिली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयात कामवर येणाऱ्या कर्मचाऱ्‍यांना दररोज लोकल गर्दीचा सामना करावा लागतो. अनेक कर्मचारी कल्याण, कसारा आणि कर्जतवरून दररोज सीएसएमटी विभागीय कार्यलयात येतात; मात्र लोकलमधील गर्दीमुळे कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी कार्यालयीन कामकाज दोन भागांत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट; तर सकाळी ११.३० ते संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असणार आहे. या निर्णयामुळे अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या गर्दीपासून मुक्ती मिळणार आहे. १ नोव्हेंबर २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी कार्यालये, बँका, रुग्णालये, शाळा, खासगी कार्यालये, उद्योगांनी त्यांच्या कर्मचाऱ्‍यांना गर्दी टाळून लोकल प्रवास करता यावा म्हणून कार्यालयांच्या वेळेत बदल करावा, यासाठी विनंती करणारे पत्र मध्य रेल्वेकडून लिहिले जाणार आहे, असे रेल्वेकडून आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Pune Barfi Seizure : पुण्यात दिवाळीआधी 'एफडीए' ची मिठाई विक्री केंद्रावर मोठी कारवाई; ३०३ किलो बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

Gopichand Padalkar Jayant Patil : सांगली जिल्हा बँकेत निवडूण येताच गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खोचक टीका; 'टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम'

Video: माधुरी दीक्षितचा मराठमोळा ठसका! नऊवारी साडी नेसून ढोल-फुगड्यांचा आनंद, पाहा ‘कौन बनेगा करोडपती’चा प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : अलीबाबाच्या गुहेत पडळकर वाघाची एन्ट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावे; आमदार सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

Rabi Crop Insurance: रब्बी पीक विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत ;गहू आणि हरभरा पिकांचा समावेश; फार्मर आयडी अनिवार्य

SCROLL FOR NEXT