Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime : हुंड्यासाठी धारावीत पतीकडून पत्नीची हत्या; पतीला अटक, सासू सासऱ्याचा शोध सुरू

हुंड्यासाठी धारावी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कन्हैयालाल सरोज या आरोपी पतीला अटक आहे.

सकाळ वृत्तसेवा

हुंड्यासाठी धारावी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कन्हैयालाल सरोज या आरोपी पतीला अटक आहे.

मुंबई - हुंड्यासाठी धारावी परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कन्हैयालाल सरोज या आरोपी पतीला अटक आहे. या प्रकरणात मृत विवाहितेचे सासू सासऱ्यावर देखील गुन्ह्याची नोंद केली असून सध्या त्यांचा शोध पोलीस घेत आहे. आरोपीने मोठ्या चलाखीने आत्महत्येचा बनाव रचला होता परंतु तपासाअंती महिलेची हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.

धारावी येथील शताब्दी नगर येथे रोशनीकुमार सरोज या विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शनिवारी मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.पाेलिसांनी रोशनीकुमार यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला हाेता.

दरम्यान रोशनीकुमार यांचे वडील सुरेशकुमार सरोज यांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी त्यांचे पती कन्हैयालाल सरोज यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. वडिलांनी हुंड्यासाठी त्यांच्या मुलीचा मानसिक आणि शरारिक छळ केला जात हाेता अशी देखील तक्रार केली. महिलेच्या सासू सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे असे पाेलिसांनी नमूद केले.पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार राेशनीकुमार यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : बहुचर्चित सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा अखेर बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT