Murder Sakal
मुंबई

Crime News : किरकोळ वादातून पत्नीची पतीकडून गळा चिरून हत्या; आरोपी पती अटकेत

किरकोळ वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्यची घटना घाटकोपर मध्ये मंगळवारी नोंदवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

किरकोळ वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्यची घटना घाटकोपर मध्ये मंगळवारी नोंदवली आहे.

मुंबई - किरकोळ वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्यची घटना घाटकोपर मध्ये मंगळवारी नोंदवली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी 39 वर्षीय आरोपी पती संतोष मुरलीधर मिस्त्री याला अटक केली आहे. आरोपीने भारतीय सैन्य दलात दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर, तो एक जिम मध्ये नोकरीला होता. पत्नीच्या हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेतच आरोपी घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन समर्पण केले.

घाटकोपर येथील असल्फा परिसरात साराभाई चाळीत ही घटना घडली. नमिता संतोष मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होत असल्याने दोघांमध्ये खटके उडत होते. मंगळवारी सकाळी 6 वाजता मिस्त्री घरी आला. त्यामुळे दोघांमध्ये बाचबाची झाली. याच वादातून मिस्त्रिने घरातील चाकूने तिच्या मानेवर, गळ्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली.

हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याने पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नमिताला राजावडी रूग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने परीसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मिस्त्रिला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तो नमिता, आई आणि पहिल्या पत्नीच्या मुलासोबत येथे राहण्यास आहे. ही त्याची तिसरी पत्नी असल्याची माहिती समजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT