cobra sakal media
मुंबई

वॉशिंग मशिनमध्ये चक्क नागोबाचा घरोबा; मुलुंड येथील थरारक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उंदरावर ताव मारण्यासाठी आलेला नाग (cobra) चक्क वॉशिंग मशिनमध्ये (Washing machine) घुसला; परंतु उंदराने (rat jump) त्याच्या तावडीतून सुटका करून मशिन बाहेर उडी मारली. या दरम्यान नाग अडकल्याचे पाहून घरातील सदस्यांची बोबडीच वळाली. ‘रॉ’ या प्राणिप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी (raw animal activist) नागाची अखेर सुटका (cobra rescue) केली.

मुलुंड पश्चिम येथील उदय नगरमधील एका घरातील सदस्य वॉशिंग मशिनमधून धुतलेले कपडे काढण्यासाठी गेला होता. त्या वेळी उंदीर पळत वॉशिंग मशिनमध्ये जाताना दिसला. त्याच्या मागे चक्क नागराज मशिनमध्ये घुसला. मशिनमध्ये डोकावून पाहताच त्यांना नाग उंदराला पकडताना दिसला. त्यानंतर उंदराने त्याच्या तावडीतून सुटका केली.

या प्रकारामुळे घाबरगुंडी उडालेल्या त्या व्यक्तीने तातडीने वॉशिंग मशिनचा दरवाजा बंद करून 'रॉ' संस्थेशी संपर्क साधला. ‘रॉ’चे प्राणिप्रेमी स्वयंसेवक ऑम्सी पारा यांनी दीड फूट लांब नागाची सुटका केली. त्यानंतर तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, असे 'रॉ’चे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी सरकारकडून समिती सदस्यांची नियुक्ती

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

Chandra Gochar 2025: 7 सप्टेंबरपासून 'या' राशीचे नशीब बदलेल, आर्थिक संकटातून मिळेल मुक्तता

SCROLL FOR NEXT