दहीहंडी sakal
मुंबई

मुंबई : महिला पथकही पाच थरांसाठी सज्ज

जन्माष्टमी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरात सर्वांना उत्सुकता असते ती दहीहंडीची.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जन्माष्टमी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरात सर्वांना उत्सुकता असते ती दहीहंडीची. कोरोनामुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहे. उत्सवासाठी केवळ पुरुषच नव्हे, तर महिला पथकेही सज्ज झाली आहेत. वांद्र्यातील गोपिका पथकानेही जय्यत तयारी केली असून यंदा वांद्रे येथील मानाच्या हंड्या फोडून दादर आणि घाटकोपरमध्ये त्या सलामी देणार आहेत. त्यानंतर हे पथक पुण्यालाही दहीहंडी फोडायला जाणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही त्या पाच थर रचून हंडी फोडणार आहेत.

दहा वर्षांपूर्वी वांद्रे येथे स्वाती महाजन, शोभा पावले आणि मंदा पवार यांच्या संकल्पनेतून गोपिका महिला पथकाची स्थापना झाली. हे वांद्र्यातील पहिले महिला पथक म्हणून ओळखले जाते. यंदाच्या दहीहंडीसाठी गेल्या महिनाभरापासून या गोपिका थरावर थर रचण्याचा सराव करत आहे. नोकरी आणि शिक्षण सांभाळून पथकातील महिला दररोज न चुकता सराव करत आहे. पथकात १४ वर्षांपासून ते ६० वर्षे वयोगटातील गोपिकांचा उत्साहाने सहभागी होतात.

जोगेश्वरी, विरार, खार, सांताक्रूझ आणि बोरिवली परिसरातील महिलांचा पथकात सहभाग आहे. यंदा मुंबईतील वांद्रे येथील मानाच्या हंड्या फोडून, दादर, घाटकोपरमध्ये सलामी देऊन थेट पुण्यात दहीहंडीचा फोडायला जाणार आहेत. पथकातील जवळपास ६० महिलांचा विमा काढण्यात आला आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी फोडायला मिळाली नाही. यंदा निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे केले जाणार असल्याने आमच्यात कमालीचा उत्साह आहे. गुरुपौर्णिमेपासून आम्ही सरावाला सुरुवात केली. आम्ही शिक्षण आणि नोकरी सांभाळून सराव करतो.

- स्वाती महाजन,गोपिका पथक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT