mumbai-municipal-corporation sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईतील भूमिगत गटारातील गाळ काढण्याची कामेही वेगात सुरू

मुंबईतील नाले सफाईच्या कामासोबत भुमिगत गटारांतील गाळ काढण्याची कामेही वेगात सुरू आहेत.

सकाऴ वृत्तसेवा

मुंबईतील नाले सफाईच्या कामासोबत भुमिगत गटारांतील गाळ काढण्याची कामेही वेगात सुरू आहेत.

मुंबई - मुंबईतील नाले सफाईच्या कामासोबत भुमिगत गटारांतील गाळ काढण्याची कामेही वेगात सुरू आहेत. येत्या ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. नियोजित वेळेत शंभर टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ असून मुंबई शहरातील भूमिगत गटारातील गाळ काढण्यासाठी १०७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

कुलाबा ते दादर विभागात एकूण या एकूण ९८.००३ कि.मी. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे साफ करण्यात येणार आहे. चार वर्षांसाठी तब्बल १०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी चार भागांमध्ये विभागून ही निविदा काढण्यात आली आहे. त्यात केवळ तीन कंपन्यांनी भाग घेतला.

या चारही निविदेत या कामात सर्वात जास्त अनुभव असलेल्या मिशिगन या कंपनीला समान कामाच्या अनुभवाची पात्रता वाहनांच्या मालकीचे निकष पूर्ण न केल्याने या कंपनीची निविदा बाद ठरवण्यात आली. तर उर्वरित दोन कंपन्यांपैंकी एका कंपनीला तीन भागांचे तर एक कंपनीला एका भागाचे काम सोपवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.

विभाग : कुवाबा आणि भायखळा

- नियुक्त कंत्राटदार:एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर

- चार वर्षांसाठी होणारा खर्च: २०.४८ कोटी रुपये

- विभाग : काळबादेवी व नाना चौक

- नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर

- चार वर्षांसाठी होणारा खर्च: २९.३७ कोटी रुपये

विभाग : भायखळा

- नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर

- चार वर्षांसाठी होणारा खर्च:२१.४३ कोटी रुपये

विभाग : ना. म. जोशी मार्ग व दादर

- नियुक्त कंत्राटदार :आर्यन पंप्स अँड इन्व्हारनो

- चार वर्षांसाठी होणारा खर्च: ३६.३१ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT