mumbai police sakal
मुंबई

मुंबई : बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्‍या तरुणाला पोलिस कोठडी

पोलिसांची दिशाभूल करणे तसेच दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्‍या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्‍यांनी अटक केली. मुस्तफा साबीरअली शेख असे या ३० वर्षीय तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी आझाद मैदान पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत तो मंगळवार, २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी सांगितले.

१६ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून मुंबई शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. या वेळी सहावी गल्ली, सोमवारपाडा या परिसराचा उल्लेख केला होता. पोलिसांनी संबंधित परिसराची तपासणी केली होती. पोलिसांची दिशाभूल करणे तसेच दहशत निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्‍यांनी मुस्तफा शेख याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानेच बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

Manoj Jarange Patil: ''माझ्याविरोधात महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली'', मनोज जरांगेंचा आणखी एक गौप्यस्फोट

Haribhau Bagde Salary Donation: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा पुढाकार; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

SCROLL FOR NEXT