mumbai sakal
मुंबई

Mumbai : कपिल पाटील यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे; सैनिक व शिक्षकांचे आझाद मैदानात शुक्रवारी धरणे आंदोलन

मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील व बलाढ्य महामुंबई शिक्षण संस्था संघटना चे पदाधिकाऱ्यांनी परस्परांशी संगनमत व षडयंत्र रचून शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ) मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांचेविरुध्द शिक्षणक्षेत्रात भीती पसरवणे,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील आणि महामुंबई शिक्षणसंस्था संघटना व इतरांनी संगनमत व षडयंत्र रचून आपल्याविरुद्ध सातत्याने खोटे आरोप करत असल्याचा आरोप शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी केला आहे.

यामुळे आपली बदनामी झाली असून कपिल पाटील यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि शासनाने सर्व स्तरातील भ्रष्टाचार रोखावा म्हणून सैनिक व शिक्षकांनी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील व बलाढ्य महामुंबई शिक्षण संस्था संघटना चे पदाधिकाऱ्यांनी परस्परांशी संगनमत व षडयंत्र रचून शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ) मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांचेविरुध्द शिक्षणक्षेत्रात भीती पसरवणे,

खून करणे, खंडणीखोरी करणे, असे अनेक खोटे आरोप गेली चार वर्षापासून सातत्याने राज्यपाल, उच्चन्यायालय, केन्द्र शासनाचे विविध विभाग, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधी व न्याय मंत्री, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, शिक्षण आयुक्त, उच्च शिक्षण विभाग, पोलीस आयुक्त, धर्मदाय आयुक्त. मुंबईतील अनेक पोलीस ठाणे यांचेकडे खोटे आरोप करीत आहे.

जंगले यांनी शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध शासनाकडे तक्रारी केल्यावर शिक्षणखात्याने कायदेशिर चौकशी नेमली, त्या चौकशीच्या अहवालानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर संस्थांवर कारवाईचे आदेश शिक्षण आयुक्त यांनी दिले आहेत.

त्यामुळे सर्व भ्रष्ट आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्वात एकत्र येऊन टिडीएफ संघटनेला व अध्यक्ष जनार्दन जंगले यांचे विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनाम व हैराण केल्याचा आरोप जंगले यांनी केला आहे.

सुमारे गेल्या १८ वर्षांपासून कपिल पाटील शासनाचे कोट्यावधी निधी लाटत आहे. आणि दुसरीकडे माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत आहे. पाटील यांनी जिथे जिथे तक्रारी केल्यात त्याठिकाणी काहीही तथ्य निघाले नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या पाटीलवर गुन्हे दाखल करावे, त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी.

- जनार्दन जंगले,अध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT