mumbaikars afraid of increasing crime gangwars shootings killings as elections approach Sakal
मुंबई

Mumbai News : वाढत्या गुन्हेगारीची मुंबईकरांना वाटतेय भिती !

निवडणुका जवळ येताच गॅँगवार, गोळीबार, हत्यांच्या प्रकारात वाढ

विष्णू सोनवणे

मुंबई : आगामी निवडणुका जसजशा जवळ येतील तसे गुन्हेगारीकरण वाढत जाईल. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळाल्यास गुन्हेगारी वाढण्याची भीती आता नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण घातक असल्याचे बोलले जात आहे. मुंबईला हादरवून सोडणारा १९८० ते १९९० चा काळ बघायला लागेल काय, अशी शंका नागरिकांच्या मनात डोकावू लागली आहे.

मुंबई पोलिसांसाठी १९८० ते १९९०चा काळ अत्यंत कसोटीचा होता. याच काळात मुंबईत वेगवेगळ्या टोळ्यांचा उदय झाला. डोंगरीत मोहंमद दाऊद समदखान, हमीद, माजिद, भायखळ्यात रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी,

आग्रीपाड्यात आलमजेब, अमीरजादा, सात रास्ता येथे अमर नाईक, दादरला मन्या सुर्वे, चेंबूरला छोटा राजन, मध्य मुंबईत सुरेश मंचेकर आदी टोळ्या सक्रिय होत्या. त्यांचा अस्तही झाला.

मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या हत्या आणि गोळीबाराच्या घटना चिंतेची बाब ठरल्या आहेत. गेल्या काही वर्षांत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात मुंबईत आणि मुंबई लगत सुरू आहेत. त्यातून गुन्हेगारीकरण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादात एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या.

उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समोरच हा गोळीबाराचा थरार घडला. गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाला होता. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

हे आरोप सरवणकरांनी फेटाळले होते. दहिसर येथे नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. या हत्येने गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढत असल्याचे दिसून आले. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT