मुंबई

"साहब, मीटर खराब है..." ज्यादा भाड्यासाठी टॅक्सी चालकांची चालबाजी

प्रशांत कांबळे

मुंबई: "साहब, लॉकडाऊन मे गाडी खडी थी, मीटर खराब है, लमसम भाडा देना पडेगा..." टॅक्सी चालकांच्या या 'डायलॉग' ने मुंबईकर वैतागले आहेत. मीटर नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करत काही टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची लूट सुरू आहे. अशा टॅक्सी चालकांवर कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून होऊ लागली आहे. 

सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर, शिवडी या मार्गांवरील टॅक्सी चालक मीटर नादुरुस्तीचा बहाणा करून प्रवाशांना अतिरिक्त भाडे आकारत आहे. परिवहन विभागाच्या नियमानुसार सध्या टॅक्सीचे भाडे 22 रुपये प्रती किलोमीटर आहे. मात्र, टॅक्सी चालकांकडून मीटरप्रमाणे टॅक्सी न चालवता तोंडी भाडे सांगितले जात असून, प्रवाशांनी अतिरिक्त भाडे देण्यास मनाई केल्यास, टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार सुद्धा सर्रास घडत आहे.

सीएसएमटी स्थानकावरून मंत्रालयात कामानिमित्त येणारे किंवा टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, भायखळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल किंवा इतरही रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी दररोज मुंबईत दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे. यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागातील नागरिक असतात ज्याच्या ओळखीचे सुद्धा मुंबईत कोणी राहत नाही. मात्र, चिट्ठीवर लिहिलेल्या एका पत्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचे असते. मात्र, रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर टॅक्सी चालकांकडून त्याची आर्थिक लूट केली जात आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मुंबईतील टॅक्सी मीटरप्रमाणे धावते किंवा टॅक्सी चालकाने स्वयंस्फूर्तीने मीटरनेच प्रमाणेच प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित असताना, अनेकवेळा मीटर नादुरुस्त असण्याच्या बहाणा केला जात असून, अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्या जात आहे. याकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा टॅक्सी चालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

तक्रारीचे सक्षम माध्यम नाही

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना तक्रारी असल्यास ट्विटर, फेसबुक अशा सोशल माध्यमांचा प्रवाशांकडून प्रभावीपणे वापर केला जातो. त्याच तत्परतेने रेल्वे प्रवाशांकडून त्या तक्रारींना प्रतिसाद सुद्धा दिला जातो. मात्र, टॅक्सी, रिक्षा किंवा रस्त्यांवरील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसंदर्भात अद्याप सक्षम असं सोशल माध्यम परिवहन विभागाचे नसल्याने टॅक्सी, रिक्षा, खासगी बस यांच्या विरोधातील तक्रारी असल्यास सांगायच्या कोणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅक्सी चालकांची संघटित वसुली

एका टॅक्सी चालकाने जादा भाडे सांगितल्या नंतर प्रवाशाने दुसऱ्या टॅक्सीचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्यास, तेवढ्या परिसरात दुसऱ्या टॅक्सी चालकांकडून प्रवाशांना प्रतिसादच मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांना तोंडी भाडे देण्यास मजबूर करण्यासाठी अनेक ठिकाणी टॅक्सी चालकांकडून संघटित होऊन जादा भाडे वसूल केले जात आहे.

गावावरून मुलाच्या उपचारासाठी मुंबईत आलो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यासाठी राहण्याच्या ठिकाणापासून अनेकवेळा रुग्णालयात जाण्यासाठी टॅक्सीने जावे लागते. या प्रवासासाठीच मोठा खर्च होतो आहे. कधी 100 तर कधी 200 रुपये टॅक्सी चालक तोंडाने सांगतात. टॅक्सी मीटरने धावते हे माहितीच नव्हतं.
प्रमोद गभने, प्रवासी
---------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbaikars being robbed by some taxi drivers because the meter is faulty

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT