मुंबई

मुंबईकरांची लाईफलाईन लोकल ट्रेन लवकरच सुरू होणार; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

सुनिता महामुनकर


मुंबई  : मागील दहा महिन्यापासून बंद झालेल्या लोकल ट्रेन सर्वसामान्यांना सुरु होण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत माहिती दिली. लोकल प्रवासाची परवानगी सर्व नागरिकांना खुली करण्यास हरकत नाही. मात्र अजूनही अनेक प्रवासी मास्क लावत नाही असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. रेल्वे प्रवास करण्याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकल प्रवास बाबत मंत्र्यांनीही लक्ष द्यायला हवे, केवळ अधिकार्यावर हा निर्णय सोपविता कामा नये असे मागील सुनावणी ला न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. वकिलांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्याबाबत एड उदय वारूंजीकर यांनी याचिका केली आहे. या सुनावणीमध्ये मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सर्व सामान्य नागरिकांबाबतीत प्रश्न विचारला होता.

Mumbaikars lifeline local train will start soon State Government Information in High Court

-----------------------------------------

(  संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

SCROLL FOR NEXT