Coastal Road 
मुंबई

Coastal Road: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सेवेत; काय आहेत वैशिष्ट्यं?

हाजी अली ते खान अब्दुल गफार खानपर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरूपात ही मार्गिका खुली करण्यात येत आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आजपासून सुरु झालाय. तसेच हाजी अली आंतरबदलातील आर्म आठ (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तरवाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) गुरुवारी (ता. ११) रोजी सकाळी सात वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरूपात खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची बुधवारी पाहणी केली.

हाजी अली ते खान अब्दुल गफार खानपर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या साधारण ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरूपात ही मार्गिका खुली करण्यात येत आहे. या मार्गिकेवरून पुढे जाऊन फक्त सागरी सेतूकडे जाता येईल.

सोमवार ते शुक्रवारपर्यंत सेवेत

किनारी रस्ता प्रकल्पातील हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील. सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नव्या कोस्टल रोडची काय आहेत वैशिष्ट्यं

-६.२५ किलोमीटरचे संपूर्ण अंतर असेल

-वरळी सी फेस ते मरिन ड्राईव्ह असे हे अंतर असेल

-४५ मिनिटावरून १० मिनिटापर्यंत वेळेच बचत

-१२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे

-टोलमुक्त प्रवास असणार आहे

-वाहतूक कोडींतून मुंबईकरांची सुटका होणार आहे

-२.७ किमी लांबीचा सागरी बोगदा असणार आहे

-वरळी, हाजीअली येथे इंटरचेंजची व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT