मुंबई

मोठी आनंदाची बातमी : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला तब्बल 'इतक्या' टक्क्यांवर

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा हजारच्या खाली आलाय. आज मुंबईत 969 नवीन रुग्ण सापडले असून आता मुंबईत एकूण कोरोना रुग्णसंख्या 94,863 झाली आहे. आज 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,402 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1011 रुग्ण बरे होऊन घरी गेले. महत्वाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर हा 70 आता टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 70 मृत्यूंपैकी  56 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 41 पुरुष तर 21 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 44 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 24 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 932 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 66,482 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1011 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत  66,633 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 70 टक्के इतका आहे. तर 13 जुलैपर्यंत एकूण 4,01,741 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 7 जुलै ते 13 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.34 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 52 दिवसांवर गेला आहे. 

( संकलन - सुमित बागुल )

mumbais corona recovery rate reached to seventy percent good news for mumbaikar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT