Mumbai Dabbawala vi network sakal
मुंबई

Mumbai Dabbawala : वी नेटवर्कची तपासणी केली मुंबईच्या डब्बेवाल्यांनी...

मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी वोडाफोन आयडीया या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीने डब्बेवाल्यांसोबत हातमिळवणी केली.

या अंतर्गत डब्बेवाल्यांनी विविध भागात जावून कंपनीच्या नेटवर्कची पडताळणी केली. त्यांच्या अनूभवावरुन संबधित भागातील नेटवर्क अधिक सक्षम करण्याचे कंपनीने केले असल्याचे सांगण्यात आले.

या मोहीमेअंतर्गत टीमने मुंबई शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन २२ वॉर्ड्स व ५५० पेक्षा जास्त ठिकाणी नेटवर्क शक्तीचे परीक्षण केले. व्हिडिओ, व्हॉइस नोट्स, डेटा व रिस्पॉन्सेस, तसेच लाईव्ह लोकेशन शेयरिंग यामार्फत डबेवाल्यांनी शहराच्या विविध भागात त्यांना आलेल्या अनुभवांचा अहवाल सादर केला.

त्यांच्या अनूभवाच्या आधारे नेटवर्क येत नाही त्या ठिकाणी नेटवर्क मजबूत केले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

डबेवाल्यांच्या मानवी नेटवर्कमुळे आम्हाला मुंबईतील आमच्या नेटवर्कबद्दल अधिक चांगला दृष्टिकोन मिळाला. त्यांनी आमच्या नेटवर्कची अतिशय काटेकोरपणे तपासणी केली. त्यातून आम्हाला आणच्या उणीवा दूर करता आल्या.

- अवनीश खोसला ,सीएमओ, वी.

मुंबईकरांसाठी आपल्या नेटवर्क अनुभवात सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी वी ने आम्हाला दिली याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.

- उल्हास मुके, अध्यक्ष मुंबई डबेवाले असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT