mumbai dabewala 
मुंबई

मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईकरांना घरच्या जेवणाचे डबे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवणारे मुंबई डबेवाले शुक्रवार (12 जुलै) आणि शनिवार (13 जुलै) असे दोन दिवसाची सुटी घेणार आहेत. त्यामुळे दोन दिवस नोकरदार वर्गाला घरचे जेवण मिळणार नाही. 

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी डबेवाले सुट्टी घेणार आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी डबेवाल्यांसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला ते आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जातात आणि आषाढी एकादशीला ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. त्यामुळे आषाढी एकादशी व द्वादषीच्या दिवशी डबेवाले सुट्टी घेणार आहेत.

पंढरपूर येथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत जेवढे वारकरी मुक्कामास येतात, त्या सर्वांची विनामूल्य राहाण्याची व द्वादशीच्या भोजनाची सोय डबेवाल्यांकडून दरवर्षी केली जाते. तशी सोय मुंबई डबेवाला या संघटनेकडून यंदादेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.
 दरम्यान, सोमवार, 15 जुलैपासून सेवा सुरळीतपणे चालू राहील, असे मुके यांनी स्पष्ट केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT