parambir singh sakal media
मुंबई

परमबीर सिंग रशियामध्ये आहेत का?

परमबीर सिंग यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप आहेत.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) कुठे आहेत? या बद्दल राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना कुठलीही कल्पना नाहीय, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी गुरुवारी सांगितले. परमबीर सिंग यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप आहेत. परमबीर सिंग रशियाला (russia) पळून गेल्याची मीडियामध्ये चर्चा आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अनेकदा नोटीसा बजावूनही परमबीर सिंग तपास यंत्रणांसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आल्याचे वळसे पाटील म्हणाले. सरकार त्यांचा शोध घेत आहे. "परमबीर सिंह हे एक सरकारी अधिकारी असल्यामुळे देशाबाहेर जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत" असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

"ते जर देशाबाहेर गेले असतील, तर ही बाब योग्य नाही. मंत्री किंवा अधिकारी कोणीही असेल तर त्यांना परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांचं इथे असणं गरजेचं आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचा हिशोब करायचा आहे, मात्र आम्ही कोणावरही जाणीवपूर्वक कुणाच्या मागे लागून कारवाई करणार नाही, हा सगळा रुटीन कारवाईचा भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! मुंबईतील 'या' मोठ्या उड्डाणपुलावर वाहनांना ३ महिने नो एन्ट्री; पण कोणत्या अन् पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या...

Teaching Jobs: मोठी बातमी! महाराष्ट्रात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर; लवकरच सुरू होणार अर्ज प्रक्रिया

PMO Shift to Seva Teerth : प्रशासनात ऐतिहासिक बदल ! पंतप्रधान कार्यालय "सेवा तीर्थ" मध्ये स्थलांतरित, साऊथ ब्लॉकमध्ये आज शेवटची बैठक

Latest Marathi News Live Update : वसई पूर्व कामन आयशा कंपाऊंडमध्ये आग लागली

Ladki Bahin Yojana e-KYC : लाडक्या बहिणींना गुड न्यूज! आता एकदमच मिळणार 6000 रुपये; 'ई-केवायसी'साठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT