मुंबई

CA परीक्षेत मुंबईच्या कोमल जैन देशात प्रथम! अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

तेजस वाघमारे

मुंबई  : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंट ऑफ इंडिया (आयसीएआय) ने घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 2) जाहीर करण्यात आला. सीए परीक्षेत नव्या अभ्यासक्रमात घाटकोपरची विद्यार्थीनी कोमल जैन देशात प्रथम आली आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या परीक्षेत सेलम (तमिळनाडू)चा इसाकीराज ए. देशात पहिला आला. 

आयसीएआयने नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यात कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला. तिला 800 पैकी 600 गुण मिळाले. परीक्षेत सूरतमधील मुदित अग्रवाल आणि मुंबईची राजवी नाथवानी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. यंदा दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 14.5 टक्के म्हणजे 19 हजार 284 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फक्त ग्रुप 1चा निकाल 12.8 टक्के लागला. ग्रुप 2 चा निकाल 31 टक्के लागला. यंदा 32 हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप 1 आणि 28 हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप 2 ची परीक्षा दिली होती. 

घाटकोपरची रहिवासी असलेल्या कोमलने 2019 मध्ये पोदार महाविद्यालयातून बी. कॉम.ची पदवी मिळवली आहे. कोरोना महामारीमुळे सीएची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाली. परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर मी देशात पहिली आल्याचे समजले आणि खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया कोमलने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोमलचे वडील निवृत्त अकाऊंटन्ट आहेत. आई वाणिज्य शाखेची पदवीधर असून गृहिणी आहे. मला लहानपणापासूनच कॉमर्समध्येच करिअर करायची इच्छा होती. सीएची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कन्सल्टन्सी किंवा फायनान्स अशा दोनपैकी कोणत्या क्षेत्रात जायचे याबाबत अद्याप मी निर्णय घेतला नसल्याचे तिने सांगितले. 

जुन्या अभ्यासक्रमात इसाकीराज ए. पहिला 
जुन्या अभ्यासक्रमानुसार घेतलेल्या परीक्षेत तमिळनाडूमधील सेलमचा इसाकीराज ए. देशात पहिला आला. या परीक्षेला चार हजार 100 विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी 5.8 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Mumbais Komal Jain first in CA exam in the country Final exam results announced

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT