मुंबई

अवयवदानाबाबत अनास्था?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - अवयवदान करणारे दाते सर्वात जास्त खासगी रुग्णालयांतून पुढे येतात; पण पालिका व सरकारी रुग्णालये त्याबाबत अनास्था का दाखवतात, असा प्रश्‍न रविवारी (ता. 28) उपस्थित करण्यात आला. परळमधील टाटा मेमोरियल रुग्णालयात 21 व्या मेडिकोलिगल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित वार्षिक राज्य परिषदेत विविध डॉक्‍टरांनी सहभाग घेतला होता. मानवी शरीर प्रत्यारोपण कायदा आणि अवयव प्रत्यारोपणाच्या नियमाबाबत झालेल्या चर्चासत्रात डॉक्‍टरांनी आपली मते मांडली. 

राज्य परिषदेचे आयोजन केईएम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक आणि टॉक्‍सीकॉलोजी विभागाने केले होते. चर्चासत्रात अवयव प्रत्यारोपणाची माहिती देताना राज्यातील पालिका व सरकारी रुग्णालयांतून अवयव प्रत्यारोपणासाठी दाते कमी येत असल्याच्या मुद्द्यावर वाद रंगला. अपघाती रुग्ण मुख्यत्वे पालिका व सरकारी रुग्णालयांत दाखल होतात. अपघातात मेंदू मृत रुग्णांची संख्याही जास्त असते. मात्र, अनास्थेमुळेच पालिका व सरकारी रुग्णालयांतून प्रत्यारोपणासाठी अवयव दाते मिळत असल्याचा मुद्दा डॉक्‍टरांनी उपस्थित केला. 

पालिका व सरकारी रुग्णालयांची संख्या खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे संख्येच्या मानाने पालिका व खासगी रुग्णालयांतून मिळणारे अवयवदाते कमी असल्याचे म्हणणे योग्य नाही, असे मत डॉ. ए. लोबो-गज्जीवाला यांनी मांडले. खासगी रुग्णालयांतील सुविधांचे समन्वय योग्य असल्याने अवयवदात्यांची प्रक्रिया सुलभतेने घडते. सरकारी रुग्णालयांत सुविधा कमी असल्याने अवयवदात्यांबाबत समन्वय साधणे कठीण असल्याचे त्या म्हणाल्या. "रॉटो'च्या समन्वयक सुजाता आष्टेकर यांनीही हाच मुद्दा मांडला. रुग्णालयांतील समन्वयकांनी अवयवदात्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही सांगितले. अवयवदानासाठी सर्व स्तरांतून सहभाग वाढायला हवा, अशी भूमिका केईएम रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. हरिश पाठक यांनी मांडली. 

समन्वयकाची भूमिका महत्त्वाची 
अवयवदाते मिळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयक नेमले गेले आहेत. त्यांची सकारात्मक भूमिका असेल तर दाते मिळतील, अशी भूमिका धुळ्यातील वैद्यकीय रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. सतीशकुमार गुप्ता, पुण्याच्या काशीबाई धुळे रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बांगल आणि धुळ्यातील वैद्यकीय रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. सतीश कुमार यांनी मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT