मुंबई

खासगी शाळांना महापालिका शाळेतील वर्ग भाड्याने देणार; मसूदा शिक्षण समितीच्या पटलावर

समीर सुर्वे


मुंबई : मोडकळीस आलेल्या खासगी शाळांना महापालिका शाळेतील वर्ग भाड्याने देण्यात येणार आहे.मात्र,त्यासाठी व्यावसायिक दराने शुल्क आकारण्यात येणार असून प्रत्येक खोलीसाठी 1ते 2 लाखा पर्यंतची अनामन ठेव भरावी लागणार आहे.या धोरणाचा मसुदा पालिका प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडली आहे.

खासगी शाळा मोडकळीस अाल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळ खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते.त्यामुळे अशा शाळांना पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी 2018 मध्ये प्रभाग समिती अध्यक्ष असताना केली होती.त्यामागणी नुसार पालिकेने धोरण तयार केले आहे.यात,अतिधोकायक म्हणजे ज्या शाळेची इमारत संपुर्ण पणे पाडून नव्याने बांधकाम करायची आहे.अशा शाळांनाच वर्ग खोल्या भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यासाठी व्यावसायिक दराने शुल्क आकारण्यात येणार आहे.तसेच,मराठी शाळांसाठी प्रत्येक खोलीसाठी 1 लाख रुपये अशी किमान दहा खोल्यांसाठी 10 लाख आणि मराठी व्यतिरीक्त इतर शाळांसाठी 2 लाख या प्रमाणे 20 सुरक्षा ठेव जमा करुन घेतली जाणार आहे.तसेच,तीसऱ्या वर्षी नंतर मासिक शुल्कात दुप्पट वाढ प्रस्तावित करण्यात अाली आहे.

जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी पालिकेच्या शाळा वापरता येणार आहे.त्यानंतर ही जागा न सोडल्यास बळाचा वापर करण्यात येईल.असे प्रशासनाने या मसुद्यात नमुद केले आहे.हा मसुदा सोमवारी(ता.14) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT