municipality neglects trees that fall anytime lives of students are in danger Ulhasnagar school Sakal
मुंबई

Mumbai : उल्हासनगरातील 'या' शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, पालिकेचे मात्र दुर्लक्ष!

महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या कल्याण-मुरबाड.राज्यमहामार्गा लगत सेंच्युरी शाळा आहे.शाळेच्या खालीच असलेल्या पायवाटेवर दोन भले मोठे सुकलेले झाडे आहेत.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : एका शाळेच्या कडेला असणाऱ्या रस्त्यावर दोन अवाढव्य मोठी झाडे सुकलेल्या अवस्थेत उभी असून त्यांचे सुकलेले सांगाडे कोसळले तर विद्यार्थी आणि वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.वस्तुस्थितीशी निगडित हा भयानक प्रकाराची पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून उल्हासनगर महानगरपालिकेचे लक्ष वेधले आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या कल्याण-मुरबाड.राज्यमहामार्गा लगत सेंच्युरी शाळा आहे.शाळेच्या खालीच असलेल्या पायवाटेवर दोन भले मोठे सुकलेले झाडे आहेत.पायवाटेच्या बाजूलाच राज्य महामार्ग असून त्यावर दिवस रात्र रोज लाखोंच्या संख्येने लहान मोठे वाहने,बस,ट्रक धावत असतात.पायवाटेवर दिवसभर विद्यार्थी,पालक आणि नागरिकांची वर्दळ असते.

सध्या वादळवाऱ्यात पाऊस पडण्याचे दिवस आहेत.अशा परिस्थीतीत ही झाडे कधीही कोसळण्याची आणि त्यामुळे विद्यार्थी,राज्य महामार्गावरून जाणारे वाहनचालक यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून महानगरपालिकेला सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या आणि त्याखाली वाहने चेपल्याच्या घटना घडलेल्या आहेत.अशा घटनेनंतर त्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असते.मग या सुकलेल्या झाडांच्या सांगाड्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष कसे?असा प्रश्न मैनुद्दीन शेख यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहणार असे मैनुद्दीन शेख यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislature Clash: नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला पोलीस कोठडी; पण किती दिवसांची? विधिमंडळातील प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Vidhan Bhavan Clash: महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का? विधान भवनातील राडा प्रकरणी मनसेचे नेत्याचा सवाल

Latest Marathi News Updates : उधारीवर घेतलेल्या सोन्याची रक्कम न देता सराफाची फसवणूक

Hijack Code Used by Pilots: विमान 'हायजॅक' झाल्याचं पायलट ‘ATC’ला नेमकं कोणत्या कोडद्वारे कळवतो?

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसतात? पायलट लोकांचा असतो विरोध

SCROLL FOR NEXT