Vaccination Pregnant woman sakal
मुंबई

मुंबई : गर्भवतींच्या लसीकरणासाठी पालिका पोहोचणार घरोघरी

आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची घेणार मदत

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेने १५ जुलैपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणास सुरुवात केली असली तरीही अद्याप उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. एकट्या मुंबईत एक लाख सहा हजार गर्भवती महिला असून त्यातील दोन हजार ६८४ जणींनीच लस टोचून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. गर्भवतींचे लसीकरण वाढवण्यासाठी आता पालिका घरोघरी पोहोचणार आहे. पालिका वॉर्ड स्तरावर काम करणाऱ्या आशा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत पालिका घेणार आहे. गर्भवतींचे समुपदेशन करून त्यांना लसीकरण केंद्रात आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही आरोग्य विभाग गर्भवती महिलांमधील लसीकरणाची टक्केवारी वाढण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

१५ जुलैपासून गर्भवतींसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. चार महिन्यांत २६८४ महिलांना लस देण्यात आली असून त्यापैकी केवळ ८८४ जणींना दोन्ही डोस घेणे शक्य झाले आहे. अलीकडे पालिकेने गर्भवतींच्या समुपदेशनासाठी खासगी स्त्री-रोगतज्ज्ञांचीही मदत घेणे सुरू केले आहे. असे असूनही गर्भवतींना अजूनही कोरोनाची लस घेण्यात रस नाही. लशीबाबत अजूनही शंका आहेत. त्यावर मात करण्यासाठी पालिका आणखी एक पाऊल उचलणार आहे. त्याअंतर्गत आता पालिका गर्भवतींच्या घरापर्यंत पोहोचणार आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की गर्भवतींना लसीकरण केंद्रात आणण्यासाठी आशा आणि प्रभाग स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहोत. आशा कार्यकर्ती व आरोग्य सेविका गर्भवतींच्या संपर्कात राहून बालकांच्या लसीकरणापासून कुटुंब कल्याण योजना राबवतात. अशा परिस्थितीत त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क असतो व ते त्यांचे ऐकतात. त्यामुळे लसीकरणाबाबत गर्भवतींच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

एका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समुपदेशन आणि मार्गदर्शन करूनही ९८ टक्के गर्भवती महिला लस घेण्यास नकार देतात. त्यामागे लशीबाबत भीती आणि अज्ञान प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या तीन महिन्यांतही गर्भवतींच्या लसीकरणात हवा तसा प्रतिसाद दिसून येत नव्हता. पहिल्या दिवसात १.६ टक्के महिलांनी लस घेतली. ८८४ जणींनी दोन डोस घेतले असल्याचे समोर येत आहेत.

स्त्री विकार तज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांनी सांगितले की, आम्ही गर्भवतींना आरोग्य स्वच्छता आणि बाळाच्या आरोग्य सुदृढतेसाठी सतत लसीकरणाचे महत्त्व सांगत आहोत. गर्भवती महिला गर्भातील बाळाच्या आरोग्याच्या चिंतेत असल्याने बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने लस घेण्यात टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष सत्राची तयारी

डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, की पालिका महिला, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याप्रमाणे गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी विशेष सत्र राबवणार आहे. झोपडपट्टी भागात अधिक प्रमाणात लशींसाठी विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे.

दुसऱ्या लाटेत अधिक प्रभावित

पालिका आरोग्‍य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना जास्त त्रास झाला. पहिल्या लाटेत १४.२ टक्के गर्भवती महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. दुसऱ्या लाटेत ती ३५.९ टक्के होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

Holi 2026: होळीवर ग्रहणाचा वेळ किती असेल? भद्रा कधीपर्यंत राहील, होलिका दहनाचा मुहूर्त येथे जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Agricultural News : कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! निर्यात शुल्कातील जाचक अटी हटवल्या; आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा कायम राहणार

Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT