मुंबई

सफाई कर्मचाऱ्याने केला एकाचा खून

दिनेश गोगी

उल्हासनगर : गांधी जयंतीला भरदुपारी उच्चभ्रू गोलमैदान परिसरातील प्रभाग समितीच्या कार्यालया समोर झालेल्या खुनाचा उल्हासनगर महानगरपालिकेचा सफाई कर्मचारीच प्रमुख आरोपी निघाला आहे. लोकलने पळून जाण्यापूर्वीच गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गांधी जयंती निमित्ताने शहरात महापौर पंचम कलानी, आयुक्त गणेश पाटील, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, नगरसेवक राजेश वधारिया, मुख्य स्वच्छता निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी विनोद केणे, एकनाथ पवार आदी स्वच्छता रॅलीत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, प्रदेश नेत्या जया साधवानी, अंजली साळवे, रोहित साळवे, किशोर धडके आदी जनजागृती रॅलीत आणि पोलिस विभाग विविध उपक्रम राबवण्यात व्यस्त असताना. ऐन दुपारी गोलमैदान मधील प्रभाग समिती कार्यालया समोरच राजू लोंढे याची डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून हत्या करण्यात आल्याने उल्हासनगरात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन शोधाशोध सुरू केली. गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, उदय पालांडे आदींनी शहाड रेल्वे स्थानकावर सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य आरोपी राहुल सोनू कमोडिया उर्फ चढू याच्या मुसक्या आवळल्या. त्यानेच राजा लोंढे याच्या डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून खून केल्याची कबुली दिली आहे. 

राहुल हा उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार असून नुकताच तो खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपातून बाहेर आलेला आहे. मयत राजा लोंढे याचे बरोबर सोनू उज्जेनवाल, रुपेश चव्हाण व राहुल कमोडिया हे पाण्याच्या टाकीखाली नशा करत बसले असताना पैशांच्या लेनदेन वरून त्यांचे आपसात भाडणे झाल्याने मुख्य आरोपी राहुल याने लोंढेच्या डोक्यावर पेवरब्लॉकची लादी टाकून त्याचा जागीच खून केला. सोनू उज्जेनवाल याला उल्हासनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश आहेर यांच्या पथकाने गजाआड केले असून रुपेश चव्हाण हा फरार झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT