crime  Sakal
मुंबई

नाश्त्यात मीठ जास्त झाल्यामुळे पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटना

नाश्त्यात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरुन नवर्‍याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : नाश्ता वेळेवर न दिल्याने ठाण्यात सासर्‍याने सूनेची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच भाईंदर पूर्व येथे नाश्त्यात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या नवर्‍याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी पतीला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाईंदर पूर्व भागातील फाटक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. निलेश घाग हा आपल्या पत्नी आणि बारा वर्षीय मुलासह रहात होता. सकाळी नाश्ता करत असताना निलेशला खिचडीत मीठ जास्त लागले. राग आलेल्या निलेशने पत्नी निर्मला हीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून तीची हत्या केली. यावेळी त्याच्या मुलाने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. नवघर पोलीसांनी निलेशला अटक केली.

निलेश याला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. गेल्या एक आठवड्यापासून खाण्यात मीठ जास्त होत होते. याबबत त्याने पत्नीला समजावले देखील होते. मात्र शुक्रवारी पुन्हा नाश्त्यात मीठ जास्त झाल्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याच्या हातून ही घटना घडली अशी कबूली आरोपीने दिल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT