Press conference sakal media
मुंबई

१५ ऑगस्टला चित्रनगरीत हजारो कामगारांचे सरकार विरोधात आंदोलन

संतोष भिंगार्डे

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी आता चित्रपटसृष्टीत (film industry) काम करणारे कॉश्युम्स, मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर्स (make up artist) कामगार 15 ऑगस्टला (Independence day) गोरेगावच्या (Goregaon film city ) दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडणार (strike) आहेत.

सिने कॉश्युम्स, मेकअप आर्टिस्ट अँड हेअर ड्रेसर्स युनियनचे सचिव सुनील कसबे यांनी पत्रकार परिषद घेतली. फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनचे सचिव निशांत सकपाळ हेही यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, वर्षानुवर्षे या क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचाराची चौकशी करावी , राजू साप्ते यांच्या आत्महत्येची सरकारने चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.

सिने कॉश्च्युम्स, मेकअप आर्टिस्ट अँड हेअर ड्रेसर्स युनियन चे सचिव सुनील कसबे म्हणाले, "कोरोनामुळे अनेकांच्या पोटावर पाय आले. कामगारांना कोणतीही आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, मृत सभासदांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केलेली नाही. तरी त्याबाबतचा निषेध म्हणून हे आंदोलन करणार आहोत. तसेच देशात कोरोना महामारी सुरु होऊन गेल्या दोन वर्षापासून हातावर बोट घेवून जगणारा रंगभूषाकार, वेशभूषाकार, केशभूषाकार,मजदूर वर्ग,देशोधडीला लागला आहे. तर असंख्य कामगार कामाअभावी मेटाकुटीला आला आहे. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हजारोंच्या संख्येने कामगार जमणार आहेत.राजू साप्तेच्या आत्महत्येप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही निशांत सकपाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Marathi News Live Updates : देशात हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन असा कोणताही धर्म धोक्यात नाही - योगगुरु रामदेवबाबा

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT