What is 'Love Jihad esakal
मुंबई

MVA Love JIhad: "महाविकास आघाडीच एक प्रकारचा 'लव जिहाद'"; भाजपची शेलक्या शब्दांत टीका

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरही भाजपनं सडकून टीका केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव जिहाद आहे, अशा शब्दांत भाजपनं शेलक्या शब्दांत टीका केली आहे. यावरुन भाजपनं उद्धव ठाकरेंना देखील टार्गेट केलं आहे. संजय राऊत यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. (MVA is like Love Jihad Criticism of BJP leader Keshav Upadhye on Uddhav Thackeray ShivSena)

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं की, महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा 'लव जिहाद' आहे. उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वतःहून याला बळी पडलेली आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी फरफट होतेय, तो ही एक प्रकारचा लव जिहादच आहे. त्यामुळे शिल्लक सेनेला आसपासचं भगव्याऐवजी हिरवं दिसायला लागलं आहे. शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना उपाध्येंनी सवाल केला आहे. त्यांनी म्हटलं, "अहो, राऊत…आमचं सोडा…. तुमच्या सोबत असणाऱ्या अबू आझमीला औरंग्या प्रिय आहे. आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेलं नाही. साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत" (Marathi Tajya Batmya)

-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT